बेळगाव / प्रतिनिधी
हुदली
(ता. बेळगाव)
येथील विद्यार्थ्यांनी
सुरळीत बस सेवेसाठी आज सकाळच्या
सत्रात आंदोलन केले. यावेळी
आंदोलन करणारे विद्यार्थी
आणि केएसआर टीसी परिवहन
कर्मचाऱ्यांमध्ये शाब्दिक
चकमक होऊन तणाव निर्माण झाला
होता.
दररोज सकाळी
हुदली हून बेळगावकडे येणाऱ्या
विद्यार्थी आणि नागरिकांची
संख्या अधिक असते. मात्र
बसची संख्या कमी असल्याने
त्यांना नाहक त्रास सहन करावा
लागत आहे. त्यामुळे
आक्रमक झालेल्या विद्यार्थ्यांनी
आज सकाळी हुदली क्रॉसनजिक बस
रोको आंदोलन केले.
विद्यार्थ्यांच्या
या आंदोलनामुळे अनेकांना
त्रास सहन करावा लागला.
हुदलीहून बेळगावला येणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त आहे. मात्र बस फेऱ्या कमी असल्याने प्रवाशांना समस्या निर्माण होत आहे. ग्रामस्थांनी राज्य परिवहन महामंडळाकडे याची मागणी केली असता केवळ आश्वासन मिळत असल्यामुळे संतप्त विद्यार्थ्यांनी सकाळी बस रोको आंदोलन करून निदर्शने केली.
0 Comments