बेंगळूर / प्रतिनिधी 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काही वेळापूर्वीच बेंगळूरच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रगती नाडप्रभू केम्पेगौडा यांच्या  108 फुटी भव्य पुतळ्याचे अनावरण  केले. यावेळी त्यांच्या समवेत राज्यपाल थावरचंद गेहलोत, मुख्यमंत्री बसवराज बोम्मई,  केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी आदि उपस्थित होते.

आमदाबाद मधील "स्टॅच्यूऑफ युनिटी" हा सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा आणि राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बी. आर. आंबेडकर यांचा मोठा पुतळा साकारलेले  भारतातील महान शिल्पकार राम सुतार यांनी या पुतळ्याची रचना आणि निर्मिती केली आहे. सदर पुतळ्याच्या उभारणीसाठी 84 कोटी रुपये इतका खर्च आला असून, पुतळ्याची तलवारच ४००० किलो वजनाची आहे. पुतळ्याच्या उभारणीसाठी १२० टन स्टील आणि 98 टन कांस्य वापरण्यात आले आहे. सदर पुतळा बेंगळूर शहरातील सर्वात उंच पुतळा आहे.

केम्पेगौडा यांचा जगातील सर्वात उंच पुतळा आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते जगाला समर्पित करण्यात आल्याने सर्वांनाच आनंद झाला आहे.