सुळगा (हिं.) / वार्ताहर
लोकप्रतिनिधी म्हणून सर्वांचे प्रेम आणि प्रोत्साहन मिळवण्याची संधी मिळणे हे माझे भाग्य आहे असे ग्रामीण मतदारसंघाच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले. बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील बडस के.एच. गावात आयोजित हळदी-कुंकू कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
तत्पूर्वी आ. हेब्बाळकर यांच्या निधीतून बडस के. एच. गावात बांधलेल्या श्री कलमेश्वर मंदिराच्या रथाच्या शेडचे आ. हेब्बाळकर यांनी उद्घाटन केले. यावेळी सोमशेखर पाटील, शंकरगौडा निंगणगौडा पाटील, अर्जुन बलारी, रामाप्पा तळवार, रामनगौडा पाटील आदी उपस्थित होते.
पुढे आमदार लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या, जेव्हा मी मतदार संघातील प्रत्येक गावात जाते, तेव्हा महिलांनी घरातील मुलीप्रमाणे माझे स्वागत केले. प्रेम, प्रोत्साहन आणि आशीर्वाद देत हळदी-कुंकू देऊन ओटी भरली. यामुळे कृतज्ञतेची भावना निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी गावातील महिला, ग्रामस्थ भरमा शिगीहळ्ळी, इनायत अली अत्तार, कल्लाप्पा वन्नुर, मन्सूर अली अत्तार, गौस शिंपी, प्रशांत पाटील, सोमशेखर पाटील, पर्वतगौडा पाटील, शंकरगौडा पाटील, रामनगौडा पाटील, भीमशी हादिमनी, शंकरगौडा गिड्डबसन्नवर आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments