- गोकाक तहसीलदार कार्यालयातील घटना
गोकाक / वार्ताहर
चोरट्यांकडून घरे फोडणे, मंदिरांमध्ये चोरी अशा घटना आपल्याला सातत्याने पाहायला मिळतात. मात्र घरे आणि मंदिरे फोडणाऱ्या चोरट्यांनी आता चक्क सरकारी कार्यालयांना ही आपले लक्ष्य बनवले आहे. बेळगाव जिल्ह्यातील गोकाक शहरात असाच काहीसा प्रकार घडला आहे.
चोरट्यांनी चक्क शहरातील तहसीलदार कार्यालयावरच डल्ला मारून संगणक लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. खबरदारी म्हणून संगणकाचा पासवर्ड आणि लॉगिन ब्लॉक करण्यात आल्याची माहिती तहसीलदार कार्यालयाकडून प्राप्त झाली आहे.
या घटनेनंतर गोकाक शहर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणाची गोकाक शहर पोलीस स्थानकात नोंद झाली असून फरार चोरट्यांना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे.
0 Comments