बेळगाव : शहरातील तिसऱ्या व चौथ्या रेल्वे गेट दरम्यान रेल्वेची धडक बसल्याने दोन गायींचा मृत्यू झाला. सोमवारी रात्री अपघात घडल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. माहिती मिळताच बेळगाव महापालिकेचे स्वच्छता निरीक्षक गणाचारी यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी भेट देऊन मृत गायींवर अंत्यसंस्कार केले.