बेळगाव / प्रतिनिधी 

वाङ्‌मय चर्चा मंडळातर्फे २०२१ चा साहित्य पुरस्कार वितरण सोहळा व रंगभूमी दिन रविवार दिनांक ६ नोव्हेंबर २०२२ रोजी सायंकाळी ५ वाजता वाङ्‌मय चर्चा मंडळ किर्लोस्कर रोड बेळगांव येथे पार पडला. पुरस्काराचे स्वरुप मानचिन्ह, प्रमाण पत्र व रोख रक्कम असे होते. सोहळ्याला बालिका आदर्श विद्यालयाच्या माजी मुख्याध्यापिका तसेच लेखिका आशा रतनजी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. प्रास्ताविक नीता कुलकर्णी यांनी केले तर पाहुण्यांचा परिचय स्वाती कुलकर्णी यांनी केला. यावेळी ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक श्री. विठ्ठलराव याळगी यांचाही मंडळातर्फे सत्कार करण्य़ात आला. 

तसेच रंगभूमी दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. नटराजाच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करुन कार्यक्रमाला सुरुवात झाली. स्वाती कुलकर्णी दिग्दर्शीत ऋतूंचे रुपरंग हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला ओमकार तमुचे, अमेय पाटणेकर, तनीश जोशी, अंकीता कदम, तेजस्वीनी सोमसाळे, संजिवनी गुर्जर या कलाकारांनी साथ दिली. तसेच नीता कुलकर्णी दिग्दर्शीत नाट्य चतुरंग (गाजलेल्या चार नाटकातील प्रसंगाचे अभिवाचन) माधव कुंटे, सुधीर शेंडे, चिन्मय शेंडे, अक्षता पिळणकर, श्रीया देशपांडे, नेहा जोशी, श्रेया सव्वाशेरी, अर्चना ताम्हणकर या कलाकारांनी तर गिटार साथ रोहीत गावडे यांनी देऊन प्रेक्षकांची वाहवा मिळवली. हा कार्यक्रम कै. रुस्तम रतनजी यांच्या स्मृतींना अर्पण केला होता.

या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन माधव कुंटे यांनी केले. तर आभार प्रदर्शन अशोक ओऊळकर यांनी केले.  हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनील पाटणेकर, नीता कुलकर्णी स्वाती कुलकर्णी, श्रीधर कुलकर्णी, रोहन दळवी, जगदीश कुंटे, विजय देशपांडे, अशोक ओऊळकर, माधव कुंटे, स्मिता कुलकर्णी, विक्रम फडके, अशोक अनगोळकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.