• कत्तलखान्यातील 28 गायींची सुटका
  • निपाणी शहरातील घटना



निपाणी / वार्ताहर

कत्तलखान्यातील गायींना गोरक्षकांमुळे जीवदान मिळाले आहे. निपाणी शहरातील एका कत्तलखान्यातून 28 गायींची गोरक्षकांनी सुटका केली आहे.


निपाणीतील एका दर्ग्यानजीक मोकळ्या जागेत या गायी पाळण्यात आल्या होत्या. गोरक्षकांनी दिलेल्या माहितीच्या आधारे निपाणी शहर पोलिसांनी त्या ठिकाणी धाड घालून गायींची सुटका केली. बैलांसह 28 गायी आणि वासरांची सुटका करण्यात आली. सुटका करण्यात आलेल्या पैकी एक गाय मृत्युमुखी पडली. सुटका केलेल्या गायींची रवानगी निपाणी समाधी मठाच्या गोशाळेत करण्यात आली आहे. याप्रकरणी निपाणी शहर पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे.