बेळगाव / प्रतिनिधी

श्री क्षेत्र दक्षिण काशी कपिलेश्वर मंदिर व इन्फिनिटी फिल्म प्रोडक्शनतर्फे आयोजित भव्य भजन गायन स्पर्धा 2022 मध्ये माऊली महिला भजनी मंडळ शास्त्रीनगर उत्तेजनार्थ पारितोषिकाचे मानकरी ठरले. मान्यवरांच्या हस्ते बक्षीस, मानचिन्ह देऊन सदर भजनी मंडळातील महिला सदस्यांचा गौरव करण्यात आला.

स्पर्धेत सहभागी झालेल्या भजनी मंडळात उषा गंगवाणी, सुनंदा पाटील, नंदिनी दामले, गायत्री नलावडे, विजया अंगडी, सुरेखा यलजी, शितल आजगावकर, विजया पाटणकर यांचा सहभाग घेतला होता. स्पर्धेवेळी मंडळाच्या सादरीकरणाला गजानन कुलकर्णी यांनी तबला साथ तर शेखर खानोलकर यांनी संवादिनी साथ दिली.