- शेतकरी नेत्यांचे विविध कारखान्यांना आवाहन
बेळगाव / प्रतिनिधी
कर्नाटक राज्य शेतकरी संघटना आणि हरित सेना नेत्यांनी चिक्कोडी उपविभागातील विविध साखर कारखान्यांना निवेदन देऊन उसाला प्रतिटन ३५०० रुपये दर देण्याची मागणी केली.
कर्नाटक राज्य शेतकरी संघटना व हरित सेनेच्या नेत्यांनी हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखाना, अरिहंता शुगर इंडस्ट्रीज यांना भेट देऊन कारखान्यांच्या प्रतिनिधींना प्रतिटन 3500 रुपये दर देण्याचे आवाहन केले.
यावेळी प्रदेशाध्यक्ष चुनप्पा पुजेरी, प्रदेश उपाध्यक्ष शिवानंद मुगलीहाळ, पदाधिकारी गणेश इळीगेर, राजू पवार आदी शेतकरी नेते उपस्थित होते.
0 Comments