खानापूर / प्रतिनिधी
चालकाचे नियंत्रण सुटून टेम्पो उलटल्याने 30 प्रवासी जखमी झाल्याची घटना गर्लगुंजी( ता. खानापूरनजीक आज दुपारी 1 वा. सुमारास घडली. जखमींना तात्काळ अधिक उपचारासाठी केएलई आणि विजया हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. याबाबत घटनास्थळावरून प्राप्त माहितीनुसार सर्व जखमी हुदली गावातील असून ते एका विवाह सोहळ्यासाठी गर्लगुंजी येथे आले होते.
0 Comments