• आढावा बैठकीत आ.अभय पाटील यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

बेळगाव / प्रतिनिधी 

बेळगाव दक्षिणचे आ. अभय पाटील यांच्या नेतृत्वाखाली बेळगाव महानगरपालिकेच्या प्रभाग क्र. 29 मधील नागरी समस्यांवर चर्चा करण्यासाठी रविवारी बैठक पार पडली. या बैठकीत प्रभागातील विविध नागरी समस्यांवर चर्चा करण्यात आली.

प्रभागातील नागरिकांनी विविध समस्या लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांसमोर मांडल्या. टिळकवाडी येथे त्रासदायक झालेली पार्किंगची समस्या, तसेच नवीन गॅस पाईप लाईन घालणे व इतर समस्यांवर या बैठकीत चर्चा करण्याची आली.

आ. अभय पाटील यांनी अधिकाऱ्यांना, नागरिकांच्या समस्यांची तात्काळ दखल घेऊन त्या सोडविण्याचे निर्देश दिले. लवकरात लवकर या समस्या सोडवण्यात येईल असे आश्वासन यावेळी देण्यात आले. बैठकीला मनपा आयुक्त डॉ. रुद्रेश घाळी, टिळकवाडी पोलीस स्थानकाचे सीपीआय दयानंद शेगुणशी, ट्रॅफिक सीपीआय बडीगेर तसेच प्रभागामधील नागरिक उपस्थित होते.