• ग्रा. पं. ला घेराव घालून  मांडले ठाण 


नंदगड /वार्ताहर 

गेल्या पाच दिवसांपासून खानापूर तालुक्याच्या नंदगड ग्रामपंचायत हद्दीतील सर्व भागाचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला आहे. यामुळे संतप्त ग्रामस्थांनी मंगळवारी ग्रा. पं. कार्यालयाला घेराव घालून आंदोलन केले.

ग्रामपंचायत उपाध्यक्ष मन्सूर तहसीलदार यांच्या 19 सदस्यांनी, हेस्कॉमने बिल न भरल्याने गावातील पथ दिपांचा विद्युत पुरवठा खंडित बंद केला असल्याचे सांगितले. ग्रा. पं. अध्यक्षांनी धनादेशावर सही केली नाही. याबाबत ता. पं. मुख्याधिकार्‍यांनाही माहिती देण्यात आली होती. मात्र त्यांनीही योग्य प्रतिसाद दिला नसल्याची तक्रार करत संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने ग्रामपंचायत आवारात एकत्र येऊन ठिय्या आंदोलन केले.

ग्रा. पं. अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्या उपस्थितीत धनादेश काढण्याची तयारी सुरू झाली मात्र यावेळी उपाध्यक्षांनी आक्षेप घेत धनादेश देण्यासाठी उपाध्यक्ष यांची गरज नसल्याचे सांगत आपण गावाच्या हितासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्यास तयार असल्याचे सांगितलेयावेळी काँग्रेस नेते महांतेश कल्याणी त्यांनी ग्रामस्थांच्या बाजू घेत घडल्या प्रकाराबाबत नाराजी व्यक्त केली.


यावेळी ग्रामपंचायतीच्या 19 सदस्यांनी राजस्थान समवेत ग्रा. पं. कार्यालयाला घेराव घेतल्याचे दिसून आले. ग्रामपंचायत सदस्य संदीप परिश्वाडकर, नागू पाटील, लक्ष्मण जांबोटकर, शफी खाजी यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ सहभागी झाले होते.