• ग्रामीण मतदार संघातील लाभार्थी शेतकऱ्यांना कृषी साहित्याचे वाटप

सुळगा (हिं.) / वार्ताहर

कृषी क्षेत्राची प्रगती झाली तरच देशाचा विकास शक्य आहे. म्हणून शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करणे आवश्यक असल्याचे मत बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी व्यक्त केले.

आज आमदार लक्ष्मी हेब्बाळकर आणि विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांनी बेळगाव ग्रामीण मतदार संघातील एकूण 19 लाभार्थी शेतकऱ्यांना कृषी साहित्याचे वितरण केले, यावेळी आमदार हेब्बाळकर बोलत होत्या. शासनाच्या विविध योजना अंतर्गत शेतकऱ्यांना आधुनिक यंत्रसामग्री उपलब्ध करून देण्यासाठी आपण कटिबद्ध असून शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घेऊन भरघोस उत्पन्न देणारी समृद्ध जमीन निर्माण करण्यात व्यस्त व्हावे असा सल्लाही आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी यावेळी दिला.

यावेळी देवराज अर्स मागासवर्गीय विकास महामंडळाच्या वतीने गंगा कल्याण योजनेतंर्गत शेतकऱ्यांना बोअरवेलचे साहित्य, पंपसेट, पाईप, इलेक्ट्रिक बॉक्स आणि बोरवेलशी संबंधित स्पेअर पार्ट्सचे वितरण करण्यात आले.