गोकाक / वार्ताहर

चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार रस्त्या नजीकच्या नाल्यात कोसळली. अंकलगी ता. गोकाक येथे अंकलगी पोलीस स्थानकाच्या  हद्दीत ही घटना घडली.

याबाबत घटनास्थळावरून प्राप्त माहितीनुसार, सिद्दप्पा कोन्नूर व त्यांची पत्नी सीमा कोन्नूर हे दांम्पत्य बेळगावहून मूळगावी धूपदाळकडे निघाले असता सिद्धप्पा यांचे कारवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाला. मात्र यावेळी स्थानिकांनी  प्रसंगावधान राखून तत्परतेने केलेल्या बचाव कार्यामुळे दांपत्याचे प्राण वाचले.

माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या अपघाताची अंकलगी पोलीस स्थानकात नोंद झाली असून पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे.