बेळगाव / प्रतिनिधी
देशभरात विविध ६०० ठिकाणी स्थापन झालेल्या केंद्रांमध्ये बेळगावच्या केंद्राचाही समावेश असून सोमवारी बेळगावमधील किसान समृद्धी केंद्राचे उदघाटन खासदार मंगला अंगडी यांच्याहस्ते पार पडले. ‘एक देश एक खत’ या नावे भारतात युरिया, डीएपी, एमओपी, एनपीके खते देण्यात येणार आहेत.
या
योजनेअंतर्गत लाभार्थी
शेतकऱ्यांना १२ व्या हप्त्याचे
वितरण करण्यात आले.
या
योजनेअंतर्गत जाहीर करण्यात
आलेल्या १२ व्या टप्यातील
निधीच्या माध्यमातून १६ हजार
कोटी रुपये सुमारे ८ लाख
शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा
करण्यात आले असून बेळगावमधील
एस. डी. कलमनी,
मार्केट
यार्ड येथे कृषी विभागातर्फे
आयोजित पीएम किसान समृद्धी
केंद्राचे उद्घाटन तसेच कृषी
परिसंवाद कार्यक्रमाचे उदघाटन
खासदार मंगल अंगडी यांच्या
हस्ते करण्यात आले.
या
कार्यक्रमात हुबळी येथील
पीपीएल सहव्यवस्थापक गणेश
हेगडे,
कृषी
तज्ञा डॉ.
बी
जी विश्वनाथ,
प्रगतशील
शेतकरी रेईदास नारायण,
शांतीनाथ
कलमनी,
एस
बी कोंगवाड,
नगरसेवक
रेशमा पाटील,
संदीप
जिरग्याळ आदींसह अनेक मान्यवर
उपस्थित होते.
0 Comments