विजयपूर / वार्ताहर
विजयपूर जिल्ह्याच्या निडगुंदी तालुक्यातील बेनाळ गावानजीक विजापूरच्या दिशेने निघालेल्या (KA-28, T-5616) क्रमांकाच्या कारची रस्त्यात अचानक मध्ये आलेल्या घोड्याला जोराची धडक बसल्याने घोडा जागीच ठार झाला. याचवेळी विजयपूरच्या दिशेने येणाऱ्या (KA-36,F1561) क्रमांकाच्या केएसआरटीसी परिवहन मंडळाच्या बसने कारला पाठीमागून धडक दिली. ही धडक बसताच कार उलटली. यावेळी कारमधून प्रवास करणारे निडगुंदी तालुक्याचे कृषी अधिकारी ए. टी. गौडर जखमी झाले.
अपघातानंतर स्थानिक आणि निडगुंदी पोलिसांना घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करून जखमी कृषी अधिकाऱ्याला अधिक उपचारासाठी निडगुंदी सरकारी रुग्णालयात पाठवले. सोमवारी सायंकाळी झालेल्या या अपघाताची निडगुंदी पोलीस स्थानकात नोंद करण्यात आली आहे.
0 Comments