•  शहर परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप
  • सीमाभागात वाहनांची कसून चौकशी

बेळगाव / प्रतिनिधी

बेळगाव,कारवारनिप्पाणी बिदर भालकीसह बहुलभाषिक सीमाभाग अन्यायकारक पद्धतीने कर्नाटक राज्यात समाविष्ट करण्यात आलायाचा निषेध म्हूणन मसमितीच्या वतीने दि.1 नोव्हेंबर कर्नाटक राज्योत्सवा दिवशी सन 1956 पासून काळा दिन पाळण्यात येतोमहाराष्ट्रात जाण्यासाठी असलेली सीमा भागातील तमाम मराठी भाषिकांची तळमळनिष्ठा व एकजूट पाहायला मिळते.

उद्या नोव्हेंबर कर्नाटक राज्योत्सव दिनाच्या पार्श्वभूमीवर कन्नड संघटनांनी बेळगाव शहरातील प्रमुख रस्त्यांवर ठिकठिकाणी लालपिवळे ध्वजशुभेच्छा देणारे बॅनर लावले आहेतदरम्यान उद्या शहरातील राणी कित्तूर चन्नम्मा चौकातून राज्योत्सव दिनाच्या मिरवणुकीला प्रारंभ होणार असून लालपिवळे ध्वज घेऊन कन्नड रक्षण विदिकेचे कार्यकर्ते रॅली काढण्याच्या तयारीत आहेत.

तर दुसरीकडे कोरोना नंतर दोन वर्षांनी पूर्वीप्रमाणेच बहुसंख्येने एकत्र येत काळ्या दिनाची मूक सायकल फेरी यशस्वी करून काहीही झाले तरी महाराष्ट्रात जाणारच असा निर्धार करून मसमितीसीमाभाग शिवसेना आणि तमाम मराठी भाषिकांनी दंड थोपटले आहेत.

समितीच्या या लढ्याला बळकटी देण्यासाठी कोल्हापूर येथून शिवसेनेच्या ठाकरे गटाचे काही नेते क्रांतीची मशाल घेऊन बेळगावकडे मार्गस्थ झाले आहेतया परिस्थितीचा विचार करता कोणताही अनुचित प्रकार घडू नये व शहरातील कायदा-सुव्यवस्था अबाधित रहावीकर्नाटक राज्योत्सव व मसमितीचा काळा दिन दोन्ही शांततेत पार पडावे यासाठी पोलीस दल सज्ज झाले आहेआजपासूनच शहरातील प्रमुख मार्गांवर तसेच चौकांमध्ये बंदोबस्तासाठी 2500 पोलीस तैनात करण्यात आले आहेत. 3 पोलीस उपायुक्त, 12 सहाय्यक पोलीस आयुक्त, 52 पोलीस निरीक्षकराज्य राखीव पोलीस दलाचे 10 पोलीस, 500 होमगार्ड यांच्या नेतृत्वाखाली सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहेशहरात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडींवर नजर ठेवण्यासाठी ड्रोन कॅमेरे, 300 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.

-सीमा भागात वाहनांची कसून चौकशी-
बेळगाव शहरात उद्या काळ्या दिनानिमित्त विविध मोर्चे व निदर्शने सायकल रॅली आदीचे आयोजन करण्यात आले आहेया सायकल रॅलीला व मराठी भाषिकांना पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रातून शिवसैनिक बेळगावला येत असतातया शिवसैनिकांना कर्नाटकात प्रवेश बंदी करून त्यांना परत पाठवण्यासाठी दूधगंगा नदी परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहेराष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर असणाऱ्या दूधगंगा नदीजवळ पोलीस फौज फाटा तैनात करण्यात आला असून महाराष्ट्रातून कर्नाटकात प्रवेश करणाऱ्या चार चाकी वाहनांवर पोलीस बारीक नजर ठेवून आहेततर दुसरीकडे चंदगड तालुक्याच्या हद्दीजवळ शिनोळीनजीक बाची येथेही चेक पोस्ट उभारण्यात आले असून महाराष्ट्रातून कर्नाटकात दाखल होणाऱ्या प्रत्येक वाहनाची कसून चौकशी केली जात आहे

           -वैयक्तिक कामासाठी येणाऱ्यांना त्रास दिला जाणार नाही -
महाराष्ट्रातील नेत्यांना कर्नाटक राज्यात न येण्याचा इशारा देण्यात आला असून वैयक्तिक काम आणि व्यवसायानिमित्त कर्नाटकात येणाऱ्यांना कोणत्याही प्रकारे त्रास दिला जाणार नाही अशी माहिती बेळगाव शहर पोलीस आयुक्त डॉएमबीबोरलिंगय्या यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे.


एकंदरीतच कर्नाटक राज्योत्सव दिवस असो की काळा दिन शहरातील शांतता कायम राहावी अशीच इच्छा नागरिक व्यक्त करत आहेत.