- सीसीबी पोलिसांची कारवाई
बेळगाव / प्रतिनिधी
अंमली पदार्थ विकणाऱ्या दोघांना रंगेहात पकडून त्यांच्याजवळील 2 लाख 70 हजारांचे अफीम व इतर सामग्री जप्त करण्यात आली आहे.
बेळगाव शहराच्या सीसीबी पोलिसांनी ही कारवाई केली.रोहिताश बिष्णोई (वय 24, मूळचा रा. जोधपूर राजस्थान, सध्या राहणार एम. के. हुबळी बेळगाव) आणि राजकुमार बिष्णोई मूळचा रा. जोधपूर राजस्थान सध्या राहणार रुक्मिणी नगर बेळगाव अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 20 ऑक्टोबर रोजी शहर गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे सीसीबीचे पोलीस निरीक्षक निंगणगौडा पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ऑटो नगर टाटा पॉवर प्लांटनजीक संशयास्पद पद्धतीने फिरत अफीमची विक्री आणि तस्करी करणाऱ्या या दोघांना रंगेहाथ पकडले.
त्यांच्या जवळील 2 लाख 70 हजार किमतीचे 325 ग्रॅम वजनाचे आफिम, एक स्विफ्ट कार, दोन मोबाईल तीन हजार रुपये रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी सीईएन पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
अफीमची तस्करी करणाऱ्या राजस्थानी युवकांच्या जोडगोळीला अटक करणार्या शहर गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक निंगणगौडा पाटील आणि सहकाऱ्यांचे पोलीस आयुक्त एम. बी. बोरलिंगय्या यांनी कौतुक केले आहे.
0 Comments