• गोकाक पोलिसांची कारवाई

बेळगाव / प्रतिनिधी

केपीटीसीएल परीक्षा गैरप्रकारातील आणखी एका आरोपीला अटक करण्यात गोकाक पोलिसांना यश आले आहे. भीमाशी (bhimappa) सिद्धप्पा गुडीगोप्प असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. सदर आरोपीने विद्यार्थ्यांना इलेक्ट्रॉनिक उपकरणे पुरवून, प्रश्नपत्रिका फुटण्यासाठी सहाय्य केले. इलेक्ट्रॉनिक उपकरणे त्याने विद्यार्थ्यांकडून पैसे घेतले असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.

त्याच्याकडून 6 मोबाईल, एक लॅपटॉप, 3 इलेक्ट्रॉनिक उपकरणे,1जप्त करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीला गोकाक प्रधान दिवाणी न्यायाधीश व जेएमएफसी कोर्टात हजर करण्यात आले. याप्रकरणी पोलिसांचा अधिक तपास सुरूआहे.