- मार्केट पोलिसांची कारवाई
बेळगाव बाजारपेठेतील बसवाण गल्लीत एका दुकानामध्ये दि. 13 ऑक्टोबर रोजी झालेल्या चोरी प्रकरणातील तीन आरोपींना अटक करण्यात मार्केट पोलिसांना यश आले आहे.
इनाम यामीन अहमद, सलमान अफजल, नदीम नसीमोहेद (तिघेही रा. उत्तर प्रदेश) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. मार्केट पोलीस स्थानकाचे एसीपी एन. व्ही. बरमनी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मल्लिकार्जुन तुलसीगेरी, पोलीस उपनिरीक्षक सुशिलकुमार कुर्ले, हुसेन केरुर, कॉन्स्टेबल लक्ष्मण कडोलकर, शंकर कुगटोली यांच्यासह पथकाने राजस्थान येथे जात आरोपींना अटक करून चार लाखांचा मुद्देमाल जप्त केला. मार्केट पोलिसांनी केलेल्या कामगिरीचे शहर पोलीस आयुक्त व पोलिस उपायुक्तांनी कौतुक केले आहे.
0 Comments