• 25 हून अधिक गुन्हे उघडकीस

हुबळी / वार्ताहर 

घरफोडी करणाऱ्या अट्टल चोरट्यांच्या जोडगोळीला अटक करण्यात हुबळीच्या केशवपूर पोलीसांना यश आले आहे. अटक करण्यात आलेले दोघेही बेळगावचे रहिवासी असून त्यांच्याकडून 91 ग्रॅम सोने, 5 किलो चांदी आणि एक कार जप्त करण्यात आली आहे.

केशवपूर पोलीस स्थानकाच्या हद्दीतील  हेमंतनगर गणपती मंदिरानजीक झालेल्या घरफोडीनंतर सदर चोरट्यां विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाच्या तपासादरम्यान दोन्ही आरोपींना अटक करून चौकशी केली असता, या दोन आरोपींचा हुबळी, धारवाड, निपाणी, संकेश्वर, बागलकोटा यासह 25 हून अधिक चोरीच्या गुन्ह्यातही सहभाग असल्याचे उघड झाले आहे.