चिपळूण दि. १९ ऑक्टोबर :
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांच्या रत्नागिरीतील चिपळूण येथील राहत्या घरावर अज्ञातांकडून हल्ला करण्यात आला आहे. भास्कर जाधव यांच्या बंगल्यावर दगड, पेट्रोलच्या बाटल्या आणि स्टम्प्स फेकून मारले आहेत. अज्ञाताने हा हल्ला केल्याचे दिसून येत आहे. मात्र हल्ल्याचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही.
0 Comments