विजयपूर / दिपक शिंत्रे
विजयपूर नगरसभेचे माजी अध्यक्ष, महानगरपालिकेचे माजी उपमहापौर राजेश देवगिरी यांच्या मातोश्री राधाबाई मोहनराव देवगिरी यांना भाजपा कडून उमेदवारी देण्यात आली असून दि. 28 ऑक्टोंबर रोजी होणाऱ्या विजयपूर महानगरपालिकेच्या निवडणुकेत सामान्य महिलांसाठी राखीव वार्ड नं 13 मधून श्रीमती राधाबाई मोहनराव देवगिरी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
शाहपेठ येथील श्री अंबाबाई मंदिरात पूजा, आरती करून मिरवणूकेस सुरुवात करुन वार्ड मधील प्रमुख मार्गावरून जिल्हा अधिकारी कार्यालयात जाऊन त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. याप्रसंगी वार्ड मधील प्रमुख, युवक, महिला, मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
0 Comments