बेळगाव / प्रतिनिधी

शांताई वृद्धाश्रमातील रहिवासी विमल मुळगुंद (मूळच्या रा. म्हैसूर) यांचे रविवारी वृद्धापकाळाने निधन झाले. शांताई वृद्धाश्रमाचे संचालक ऍलन मोरे यांनी विमल मुळगुंद यांच्या अंतिम इच्छेनुसार  त्यांचा मृतदेह बैलहोंगल येथील डॉ. रामण्णावर चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने हुबळी येथील गब्बूर क्रॉस नजीक असलेल्या केएलई जगद्गुरु गंगाधर महास्वामी मुरूसावीर मठाच्या वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमासाठी पाठवला आहे. प्राध्यापक आणि शरीर रचना विभागाचे प्रमुख डॉ. महांतेश रामण्णावर यांनी देहदानाची प्रक्रिया पार पडली.

केएलईचे नुतन प्रकल्प अधिकारी डॉ. व्ही. डी. पाटील, प्राचार्य डॉ. एम. जी. हिरेमठ, सामाजिक कार्यकर्ते विजय मोरे, मारिया मोरे, संतोष ममदापुर, वसंत बालीगा, डॉ. रामण्णावर ट्रस्टच्या अध्यक्षा डॉ. सुशीलादेवी रामण्णावर यांनी देहदान करणाऱ्या कुटुंबीयांचे आभार मानले.