• मध्यवर्ती म. ए. समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांचे आवाहन

बेळगाव / प्रतिनिधी

केंद्र सरकारने मराठी बहुल सीमा भाग अन्यायकारकरित्या कर्नाटकात डांबला आहे. याचा निषेध म्हणून गेल्या 65 वर्षांपासून मराठी भाषिक म. ए. समितीच्या नेतृत्वाखाली अखंडपणे लढा देत आहेत. सीमा प्रश्न दाखल झालेल्या खटल्याची सुनावणी सुप्रीम कोर्टात येत्या 23 नोव्हेंबरला होणार आहे.

या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात जाण्याचा निर्धार दाखवून देण्यासाठी उद्या 1 नंबर काळा दिन आणि सायकल फेरी हजारोंच्या संख्येने सहभागी यशस्वी करा असे आवाहन मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांनी सीमावासीयांना केले आहे.