हुबळी / वार्ताहर 

रस्ता ओलांडणाऱ्या एका व्यक्तीला अज्ञात वाहनाची धडक बसल्याने तो जागीच गतप्राण झाला. पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील रिलायन्स मॉल नजीक आज सकाळी हा अपघात घडला. या अपघातात अंदाजे 25 ते 30 वर्षे वयोगटातील व्यक्तीचा मृत्यू झाला. मृताच्या डोक्यावरून वाहून गेल्याने तिच्या चेहऱ्याचा  चेंदामेंदा झाला आहे. अद्याप या मृत व्यक्तीची ओळख पटलेली नाही.

मृतदेह शवविच्छेदनासाठी हुबळीच्या किम्स रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. घटनेची  नोंद हुबळी ग्रामीण पोलीस स्थानकात करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.