विजयपूर : येथील ज्येष्ठ पत्रकार श्रीराम पिंगळे (वय 92) यांचे आज पहाटे स्वगृही निधन झाले त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा एक मुलगी सून, नातवंडे असा परिवार आहे.

अहमदनगरहून 1950 साली विजयपूरात आलेले श्रीराम पिंगळे सुरुवातीला दैनिक भारत (नागपूर) या वृत्तपत्रकाचे बातमीदार म्हणून पत्रकार क्षेत्रात कार्यास सुरुवात केली. 

सोलापूरच्या दैनिक संचार चे तर सुरुवातीपासून बातमीदार म्हणून कार्यरत झाले होते तसेच दै.समाचार, दै.विश्वसमाचार, तरुण भारत पुणे व सोलापूर, दै. पुढारी कोल्हापूर सह अनेक मराठी दैनिकांसाठी त्यांनी सलग 65 वर्षे बातम्या व विशेष लेख पाठवित होते.

हुबळी येथील संयुक्त कर्नाटक या कन्नड दैनिकासाठी काही काळ बातम्या पाठविल्या. मुंबई येथील हिंदुस्थान समाचार या वृत्तसंस्थेला ही ते मजकूर पाठविले आहे.

बातमी लिहणे, घटनेची शहानिशा करून त्याची बातमी बनविणे या त्यांचा हातखंडा होता. तसेच तत्कालीत ज्यलंत सामाजिक समस्या वर, राजकीय विश्लेषण अनेक लेखनही केले आहे. वयाच्या 86 वर्षापर्यंत त्यांनी लिखाण केले आहे.

श्रीराम पिंगळे यांचा लोक संग्रह फार मोठा होता पिंगळे चाचा म्हणून ते ओळखले जात होते. महाराष्ट्र व कर्नाटकातील राजकीय क्षेत्रातील अनेक नेत्यांशी वैयक्तिक दृढ संबंध होते.

भारताचे पंतप्रधान मंत्री पंडित जवाहरलाल नेहरु हे 1961 मध्ये विजयपूरला आले होते. तेव्हा त्यांनी पिंगळेंच्या घरी भेट दिली होती. अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, माजी उपराष्ट्रपती बी.डी.जत्ती, माजी मुख्यमंत्री विरेंद्र पाटील यांच्या सह अनेक नेत्यांनी त्यांच्या घरी भेट दिली होती. विजयपूर जिल्ह्यातील जवळपास सर्वच राजकीय नेत्यांशी घनिष्ठ संबंध होते. 

श्रीराम पिंगळे हे उत्कृष्ट नकलाकार ही होते, त्यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या समोरच त्यांच्याच शैलीत भाषण करुन त्यांची वाहवा मिळवली होती. अनेक जणांचे व पक्षाच्या आवाज काढणे हा त्यांचा छंद होता. विजयपूर जिल्ह्यातील अनेक पत्रकारांचे ते मार्गदर्शक होते.