- जिल्हा पोलीस प्रमुख एच. डी. आनंद कुमार यांची पत्रकार परिषदेत माहिती
विजयपूर / वार्ताहर
विजापूर जिल्ह्यातील शाळांमधून मुलांच्या माध्यान्ह आहारातील तांदळासह अन्य साहित्य चोरणाऱ्या सहा आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस प्रमुख एच. डी. आनंद कुमार यांनी दिली.
विजापूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना एसपी आनंद कुमार म्हणाले, शरथ दोडमणी, श्रीकांत कट्टीमणी, मल्लिकार्जुन मोपागार, संतोष होसकोटी, संजीवप्पा मॅगेरी, सचिन हनश्याळ आणि राहुल पवार आणि चोरीचा तांदूळ विकत घेणारे नागराज ओपिन यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्यांकडून 2.70 लाख किमतीचा 50 क्विंटल तांदूळ, 2.24 लाख किमतीचे 15 क्विंटल तूर डाळ, दोन मिनी मालवाहू वाहने, एक क्रुझर, आणि रोकड असा 1 लाख 6 हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
0 Comments