(फोटो सौजन्य : नागराज 6.0 फोटोग्राफी) 

सुळगा (हिं.) दि. 29 सप्टेंबर :

सुळगा (हिं.) येथील सीमेदेव युवक मंडळाच्या वतीने खास नवरात्रौत्सवानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सांस्कृतिक कार्यक्रमांपैकी पुरुष आणि महिला, तसेच महिला स्पेशल दांडिया  राऊंडचे उद्घाटन काल बुधवार दि. 28 सप्टेंबर 2022 रोजी करण्यात आले. 

महिला स्पेशल दांडिया राऊंडचे उद्घाटन ज्येष्ठ कार्यकर्त्या पूजा सुनील आवडन, शांता बाळू सांगावकर, सिंधु कांबळे, सुवर्णा शिगेहळ्ळीकर, विमल बडिगेर यांच्या हस्ते करण्यात आले.

तर पुरुष आणि महिला स्पेशल दांडिया राऊंडचे उद्घाटन ह. भ. प. मल्लाप्पा भैरू पाटील, माजी अध्यक्ष  विठ्ठल रुक्मिणी भजनी मंडळ सुळगा,(हिं.) यांच्या हस्ते करण्यात आले.

यानंतर दांडिया स्पेशल राऊंडला सुरुवात झाली. प्रथम महिलांचा स्पेशल त्यानंतर पुरुष आणि महिला यांचा एकत्रितपणे स्पेशल दांडिया राऊंड घेण्यात आला.

यावेळी स्पर्धकांनी केलेल्या सादरीकरणाने उपस्थितांची वाहव्वा मिळवली. याप्रसंगी सुनील आवडन, राज सांगावकर, विनायक सुतार, सचिन सावंत यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते.