संकेश्वर / वार्ताहर

संकेश्वर शहराच्या बाह्य भागात राष्ट्रीय महामार्ग लगत बायपास रोडवरील विहिरीत रविवारी सकाळी एका व्यक्तीचा मृतदेह आढळला.

संकेश्वर शहराच्या हद्दीतून जाणाऱ्या पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गाच्या बायपास रोडवर डॉ. सचिन पाटील यांच्या शेतातील विहिरीत एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे.

ही व्यक्ती मूळची निप्पाणी शहरातील असल्याची माहिती मिळाली आहे. सदर व्यक्तीने आत्महत्या केली आहे की घातपात आहे हे पोलीस तपासा नंतरच स्पष्ट होणार आहे.