बेळगाव / प्रतिनिधी  

बेळगावात उद्या शुक्रवारी विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी वाहतूक व्यवस्थेत बदल केले आहेत. दुपारी 2 वाजल्यापासून ते शनिवार 10 सप्टेंबर 2022 रोजी विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत वाहतूक मार्गात बदल केला आहे. त्याचप्रमाणे मिरवणूक पाहण्यासाठी शहरात येणाऱ्या नागरिकांनी सर्व प्रकारची वाहने शहरात न आणता बाहेरील भागात पार्किंग करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

   विसर्जन मिरवणुकीदरम्यान बेळगाव शहरातील      पार्किंगच्या ठिकाणांचा तपशील खालील प्रमाणे  

1) बेननस्मिथ कॉलेज मैदान, २) वनिता विद्यालय, धर्मवीर संभाजी चौक ते देशपांडे खुट व पुढचा रोड, 3) धर्मवीर संभाजी सर्कल जवळील लिंगराज पाटील यांची खुली जागा, 4) फिश मार्केटकडून इस्लामिया शाळेकडे जाणाऱ्या रस्त्याच्या एका बाजूला, 5) मराठा विद्यानिकेतन बन्नी मैदान, ६) देशपांडे खुट ते गांधी सर्कल अरगन तलाव यापैकी रस्त्याच्या एका बाजूला, 7) खंजर येथे पार्किंग, 8) महाद्वार रोडवरील संभाजी उद्यान, येथे नागरिकांच्या वाहनांच्या पार्किंगसाठी जागा निश्चित केल्या आहेत.

केवळ याच ठिकाणी वाहने पार्क करावीत व पोलिसांना सहकार्य करावे अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा पोलिसांनी दिला आहे.