उत्पादन शुल्क विभागाची कारवाई
विजयपूर / वार्ताहर
विजयपूर जिल्ह्याच्या बबलेश्वर तालुक्यातील संगापुर क्रॉसजवळ दुचाकी वरून गांजाची अवैध वाहतूक करणाऱ्याला उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकून अटक केली.
परसप्पा चन्नाप्पा सिंग असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी परसप्पा याने 980 ग्रॅम सुका गांजा दुचाकीवरून नेण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी छापा टाकून एक लाख रुपये किमतीची दुचाकी आणि गांजा जप्त केला. याप्रकरणी उत्पादन शुल्क विभागात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
0 Comments