बेळगाव / प्रतिनिधी

बेळगाव महानगरपालिकेच्या वॉर्ड क्रमांक 29 चे नगरसेवक नितीन जाधव यांनी आपल्या वॉर्ड मधील नागरिकांच्या तक्रारी आणि समस्या जाणून घेण्यासाठी जनसंपर्क कार्यालय सुरू केले आहे.

या कार्यालयाचे आज बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले.

यावेळी भाजपच्या गीता सुतार,भरत देशपांडे, अशोक नाईक  शहराच्या विविध वॉर्डातील नगरसेवक व नागरिक उपस्थित होते.