दुचाकीवरील अन्य एकजण जखमी
विजयपूर / वार्ताहर
अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक बसून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार तर दुचाकीवरील अन्य एकजण जखमी झाल्याची घटना विजयपूर शहरातील साई पार्क नजीक रेल्वे ब्रिज जवळ आज सकाळी 11 वा. सुमारास घडली. सौरभ सारवाड (वय 17) असे अपघातात मृत्यू झालेल्या दुर्देवी युवकाचे नाव आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार सौरभ अन्य एका सह दुचाकीवरून साई पार्क कडे निघाला होता. याच दरम्यान रेल्वे ब्रीजनजीक आला असता त्याच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. यात सौरभ जागीच गतप्राण झाला. तर दुचाकीवर मागे बसलेला अन्य एकजण जखमी झाला आहे. या घटनेनंतर भुताचा किल्ला धडक देणाऱ्या अज्ञात वाहनाच्या चालक फरार झाला आहे. या अपघाताची नोंद विजापूरच्या वाहतूक पोलिस स्थानकात करण्यात आली असून पोलीस त्या अज्ञात वाहनधारकांचा शोध घेत आहेत.
0 Comments