बेंगळूर / प्रतिनिधी

राज्य सरकारतर्फे 4,475 स्वातंत्र्य सैनिकांना दरमहा रु. 10,000/- पेन्शन   दिली जाते. पण पेन्शनधारक  स्वातंत्र्य सैनिकांची संख्या कमी असल्याचे (डीपीएआर) विभागाचे म्हणणे आहे. हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच स्वातंत्रसैनिक हयात असून बहुतेक पेन्शन ही स्वातंत्र्यसैनिकांच्या  कुटुंबीयांना मिळत असल्याची माहिती ही विभागाने दिली आहे. 

स्वातंत्र्य सैनिकांच्या आकडेवारीत बेळगाव अग्रस्थानी असून शहरात 870 हून अधिक  स्वातंत्र्यसैनिक आहेत. बेळगाव नंतर धारवाड येथे (511),बेंगळूर शहरात (472), तुमकुर (376) स्वतंत्र सैनिक आहेत. स्वातंत्र्य सैनिकांना मिळणारी पेन्शन अलीकडेच महसूल विभागाकडे हस्तांतरित करण्यात आली आहे.

आत्तापर्यंत 602 पेन्शन लाभार्थ्यांची माहिती मिळाली आहे. त्यापैकी  फक्त 98 स्वातंत्र्यसैनिक हयात आहेत आणि तिघांचा पत्ता मिळाला नाही. तर उर्वरित 501 पेन्शन धारक स्वातंत्र्यसैनिकांचा मृत्यू झाला असल्याचेही विभागाकडून सांगण्यात आले आहे.