![]() |
(फोटो : शट्टूप्पा (बाळू) पाटील, सुरेश कुराडे रक्तदान करताना) |
सुळगा (हिं.) /वार्ताहर
भारतीय संस्कृतीत कन्यादान, नेत्रदान, अन्नदान यांना विशेष महत्त्व आहे. अलीकडेच यात मरणोत्तर अवयव व देहदान याची भर पडली आहे. याप्रमाणे शस्त्रक्रिया असो किंवा इतर उपचार रुग्णाला ऑक्सिजन प्रमाणेच नितांत गरज असते ती रक्ताची. रक्त वेळेत मिळाले तर रुग्णाचे प्राण वाचू शकतात म्हणूनच 'रक्तदान' हे 'श्रेष्ठदान' मानले जाते. निरोगी व्यक्तीला वर्षातून दोनदा रक्तदान करता येते. रक्तदानामुळे शरीरातील रक्त वाढीस चालना मिळते. पण जागृतीचा अभाव असल्यामुळे तरुणाईमध्ये रक्तदानाचे प्रमाण खूप कमी असल्याचे पाहायला मिळते. म्हणूनच रक्तदानाचे महत्त्व पटवून देण्याचे कार्य सुळगा (उ.) ग्रा. पं. सदस्य तथा जल निर्मल कमिटीचे अध्यक्ष शट्टूप्पा (बाळू) पाटील यांच्यासह पंचक्रोशीतील श्री. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान उचगाव, विभाग प्रमुख मिथिल जाधव आणि कार्यकर्ते करत आहेत.
![]() |
(मिथिल जाधव) |
पूरपरिस्थिती, अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान एवढेच नव्हे तर कोरोना काळातही त्यांनी केलेले मदतकार्य निश्चितच कौतुकास्पद आहे. त्यांच्या या सामाजिक कार्याचा वसा युवापिढीने घेण्याची गरज आहे.
दरम्यान आजही सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवत त्यांनी रक्तदान केले. तालुक्याच्या पश्चिम भागातील उचगाव शूरवीर गल्ली येथील युवक सचिन अर्जुन वाडकर (वय 31) हा टायफाईडने आजारी असून येळ्ळूर रोड केएलई रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. उपचारादरम्यान त्याला 'ए' पॉझिटिव्ह रक्ताची गरज भासली. तेव्हा वडिलांनी रुग्णालयातून श्री. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान उचगाव विभागप्रमुख मिथिल जाधव यांच्याशी संपर्क साधला. यानंतर जाधव यांनी गावातील शिवप्रतिष्ठानचे युवा कार्यकर्ते यांच्यासह सुळगा (हिं.) ग्रा. पं. सदस्य शट्टूप्पा (बाळू) पाटील यांना कळविले. माहिती मिळताच सर्वांनी तातडीने रुग्णालयाकडे धाव घेतली.
यावेळी सुळगा (हिं.) ग्रा. पं. सदस्य शट्टूप्पा (बाळू) पाटील यांच्यासह श्री. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान उचगावचे कार्यकर्ते सुरेश कुराडे यांनी रक्तदानाचे पवित्र कार्य केले.
![]() |
(शट्टूप्पा उर्फ बाळू पाटील) |
![]() |
(सुरेश कुराडे) |
याप्रसंगी आकाश कोळी, भाऊ मेणसे, प्रवीण कुंडलकर, नागण्णी पाटील, रोहन शट्टूप्पा पाटील आदी उपस्थित होते.
0 Comments