विम्याचे पैसे हडपण्यासाठी ट्रॅक्टर चोरीची खोटी फिर्याद
गोकाक / वार्ताहर
विम्याचे पैसे हडपण्यासाठी ट्रॅक्टर चोरीला गेल्याची खोटी फिर्याद देणाऱ्या बाप लेकांचा गोकाक पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी मुलाला अटक करण्यात आली आहे.
विम्याच्या पैशासाठी ट्रॅक्टरची चोरी झाल्याची खोटी तक्रार दाखल करणाऱ्या आरोपीला गोकाक ग्रामीण पोलिसांनी अटक करण्यात यश मिळवले आहे. विमा पॉलिसीचे पैसे हडपण्यासाठी कट रचून बाप-लेक दोघांनी मिळून अशी खोटी तक्रार गोकाक पोलिसात दिली होती. गोकाक ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास केला असता ट्रॅक्टर लपवून ठेवल्याचे समोर आले. या प्रकरणी मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
0 Comments