11 मोबाईल, 8 दुचाकींसह; 1 लाख 85 हजारांचा मुद्देमाल जप्त

गोकाक ग्रामीण पोलीस आणि सीईएन पोलिसांची संयुक्त कारवाई

बेळगाव / प्रतिनिधी 

गोकाक ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोन्नूर गावात सार्वजनिक ठिकाणी जुगार खेळणाऱ्या 12 जणांना अटक करण्यात जिल्हा गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना यश आले आहे.

काल दि. 5 ऑगस्ट रोजी जिल्हा सीईएन पोलीस स्थानकाचे  निरीक्षक वीरेश दोडमणी, उपनिरीक्षक  नागनगौडा कट्टीमणी गौडर, डीसीआरबीचे उपनिरीक्षक बसगौडा पाटील आदींच्या नेतृत्वाखाली प्राप्त  माहितीनुसार  ए.आर.मलगी, बी.एस.चिन्नीकुप्पी, एन.आर.घाडेप्पनवर, जी.एस.लमाणी, एस.आय.भांडी, यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे.

अटक करण्यात आलेल्यांकडून 1 लाख 85 हजार रुपये रोख, 11 मोबाईल फोन, 8 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. त्यांच्यावर गोकाक ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या या कामगिरीचे गुन्हा विभाग पोलीस व गोकाक ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस अधीक्षक डॉ. संजीव पाटील यांनी कौतुक केले आहे.